अनुभवातून शिक्षण ज्ञान हे घोकंपट्टीने मिळत नाही| तर अनुभवातून, व्यवहारिक अनुभवाने मिळते| संस्कार हे सुद्धा आपल्या चांगल्या वागण्यातून, अनुकरणीय वागण्यातून मिळत असते. फक्त घोकंपट्टी,पाठांतर ह्यापेक्षा प्रत्यक्ष अनुभूतीतून मिळालेले ज्ञान उपयोगी व कायमस्वरूपी लक्षात राहते| दृक्श्राव्य सीडीद्वारे मुलांना दाखविलेले घटक लवकर आकलन होते|
सिडी शैक्षणिक साहित्य म्हणून खूपच उपयोगी आहे|
हेमा फाउंडेशन केलेला हा उपक्रम स्तुत्य व कौतुकास्पद आहे|
धन्यवाद !
सौ.ऋतुजा गवस.